STORYMIRROR

kishor zote

Others

3  

kishor zote

Others

असे व्हावे कधीतरी

असे व्हावे कधीतरी

1 min
2.1K


डोळा बांध फुटावाच

मन साफ तेच करी

मनं जुळावी अशीच

असे व्हावे कधीतरी


रंग रंग एक होता

व्हावे इंद्रधनू परी

माझ्या रंगात तू रंग

असे व्हावे कधीतरी


एक पाऊल टाकता

साथ द्यावी कोणी तरी

बोटे गुंफावी बोटांत

असे व्हावे कधीतरी


दूर जाणारे नाते ते

मिटावी मग दरी

एक कुटुंब साऱ्यांचे

असे व्हावे कधीतरी


शब्द माझेच सारे ते

बंड माझ्याशीच करी

क्रांती घडावी त्यातून

असे व्हावे कधीतरी


साहित्याला गुण द्या
लॉग इन