असे मी पाहतो जगणे
असे मी पाहतो जगणे
1 min
28.1K
कुणाचे श्वास मी व्हावे
कुणाचा ध्यास मी घ्यावा
कोठली वाट तुडवावी
कुणा आधार मी द्यावा
अशा रंगात मी रंगे
कुणाला घेऊनि संगे
कोणते वार मी झेलू
खुजे आभाळ बेरंगे
उगवता सूर्य विझलेला
मला हाकारती किरणे
उन्हाचे बांधूनी इमले
असे मी पाहतो जगणे
तरळते स्वप्न डोळ्यांतून
फुलांचे रंग ते लेवून
असावे रोज दिमतीला
चांदणे मखमली होऊन
