STORYMIRROR

सुरेश पवार

Tragedy Inspirational

3  

सुरेश पवार

Tragedy Inspirational

असे का घडते?

असे का घडते?

1 min
59

असे का घडते माझ्या बाबतीत,

राब राब राबतो शेती करतो,

इमाने इतबारे कष्ट करतो,

दुःखाने कमावतो सुखाने खातो।।।१।।।


भर उन्हात नांगरणी करतो,

सर्ज्या राजाची साथ सोबत घेतो,

तूच माझा दोस्त रे, तूच माझा राजा,

तुझ्यामुळे जीवनाचा सार्थ येतो।।।२।।।


कधी पडतो दुष्काळ ना चारा, ना पाणी,

दाही दिशा वणवण भटकतो, मुके 

जनावराची तहान भागविण्यासाठी,

असे का घडते जीवन होते सुके।।।३।।।


आस लावतो वरुण राजावर,

पूजा करतो तुझी, तू आहे महान,

कृपा कर मजवर, बरस रे जमिनीवर,

कधी मिटवशील या जनाची तहान।।।४।।।


असे का घडते माझ्या बाबतीत,

सततचा दुष्काळ, भयावह परिस्थिती,

माझ्या मेहनतीला दे रे साथ, माझ्याच

नशिबात का भोग, कधी येईल सुस्थिती।।।५।।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy