असे होईल एकदा
असे होईल एकदा
असे होईल एकदा,
बोले आयुष्य हो तेव्हा
वेळ संपली माणसा
बघ मिळाले ते जेव्हा
अर्थ समजण्यास हो
गेले खर्ची ते आयुष्य
आली वेळ ही मृत्यूची
आता कळे हो आयुष्य
जमा , बेरीज, ते उणे
बाकी गणिताने होणे
परिस्थिती शिकवले
हेची नाव हो जगणे
दार समोर मृत्यूचे
उभा यमराज दिसे
नाही निघे रे पावले
यमदेव मला हसे
नाही घेणार तो घूस
आहे नियमाचा पक्का
लागे त्याच्या मागे निघा
द्यावा लागेल तो धक्का
म्हणे पुढे नाही बाप्पा
मिळे दुसऱ्या हा मोक्का
अंत यात्रेत चालती
लोक माणसे हा चोखा
मृत्यू सरेवर निजे
माझे शरीर हे शांत
नाही निघे तोंडी शब्द
आत्मी माझ्या असे खंत
वैरी असो वा तो मित्र
उपस्थित असावा हा
आग्नी जळती शरीर
मुक्त झाला जिव पहा
नसे उपस्थित तेथे
गर्दी माणसाची जर
काय कमवले पुर्ण
आयुष्यात बघा बर
जोडा नाती हो माणसे
खरी संपत्ती आपली
जगा जगूया हा मंत्र
देऊ किमया आपली
