STORYMIRROR

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

अरे मंगळवार उजाडला...!

अरे मंगळवार उजाडला...!

1 min
26.9K



अ रे अरे थांबला रे पाऊस

रे टली रे देवा कशीबशी हौस


मं गळ अमंगळ नाही केला विचार

ग डबडीत घसरला पाय होता अनाचार

ल डबडली काया सारी पाहून रे पाणी

वा टले वाचवण्या येतील कोणी

र म्य ते जीवन संघर्षाचे


उ गाचच मी देवा ताडीले

जा ता जाता जीवन मुर्खपणात सम्पविले

ड गमगले अंतर्मन असता अधांतरी हवेत

ला ज वाटते म्हणण्या घे मजला कवेत....!!!


जन्म मृत्यू हे एकची सत्य देवा

जाणले मी येताना तुझ्या कडे

आता निरोप धाडतो

पाहुनी त्यांच्या कडे


नका येऊ इकडे घायी करून

जन्म दिला देवाने जगण्या

आनंदा साजरा करण्या जगून

तृप्त व्हा रे बांधवांनो


जीवन उन्नत उज्वल बनवून

कधी कोणी सुखी होत नाहीं रे मागून

देव सांगतो सिद्ध करा स्वतःला आणि

मिळावा जिद्दीने हवे ते जीवनात

इतुकेच सांगावे वाटते मज आता

शेवटच्या कवनात.....!!!


Rate this content
Log in