अरे माणसा माणसा
अरे माणसा माणसा
अरे माणसा माणसा, कधी होशील माणूस
कातडीत माणसाच्या तू आहेस कणीस
माकडाचे रूपांतर माणसात झाले
शेपटी गळाली अन केसही पळाले
प्राणिमात्रामध्ये आहेस तू प्राणी महान
खऱ्या विदवत्तेची तू आहेस रे खान
स्वार्थासाठी स्वतः च्या, ओरबडतोस निसर्गास
कडधान्य भाजीपाला सोडून, खातोस प्राण्यास
आदिशक्ती समान स्त्रीस, तू भोगतोस भोग्या समजून
झाले काळे तोंड तुझे,काळ्या करतुती करुन
लाचखोरी भ्रष्टाचार कुकुरमुत्यासारखे वाढले
वासनेपोटी रे माणसा पोट कुमारिकेचे फाडले
हरवली संवेदना, माणुसकीला वेशीला टांगले
कौर्याने सीमा गाठली,बलात्कार करून डोळे दगडाने ठेचले
स्त्रीचा अर्थ फक्त योनी,तेव्हढेच तुला दिसते
डोमकावळ्याची जशी सभा मढ्यावर भरते
उडविल्या चिंधळ्या तनाच्या आणि मनाच्या
उसवली वाकळ उरला गोतावळा लक्तराचा
संतप्त जमावाने जीव घेतला बापाचा
भेदरले चिमुकले गोळा हाती जातीपातीचा
विसरल्या चवी सर्व, चव रक्ताची उरली
रक्त पिऊन जातीधर्माचे,माणसाची माणुसकी दवडली
घडवूनी दंगली जित्या माणसाला कापतोस
काढून मिरवणूक झेंड्याची, तिरंग्याला ही लाजवतोस
महागाईचा काळसर्प अख्खा गरिबीला गिळतो
बालयौन अपराध, लेका लेकीला छळतो
निर्घृण निर्दयी कुकृत्य,माणूस जन्माची नाचक्की करतोस
सत्कर्म राहे पाठी,संपत्ती कशाला जमवतोस
अनमोल जन्म माणसाचा, जग जरा तरी माणसावाणी
तरळतील डोळ्यात अश्रू, झिजेल देह जेव्हा चंदनावानी
