STORYMIRROR

Vijay Sanap

Others

4  

Vijay Sanap

Others

अरे कापूस कापूस

अरे कापूस कापूस

1 min
27.5K


अरे कापूस कापूस

कारे झाला तू उदास

तुह्या नावानं रडते

साऱ्या गावात माणसं ।। धृ ।।


शेता पेराया घातलं

अख्या जगातल पीक

नाही पडला पाऊस

गेली उडूनीया झोप

बाप पाहे टकमक

माय बसती उशास ।। अरे...


काळ्या भूईच्या पोटात

रोप तुहं रुजवतं

वर पहाता पहाता

पाणी डोळ्याच रे जातं

गर्द काळ्या आभाळात

कसा दिसना पाऊस ।। अरे...


पाणी भरून भरून

पळ्हाटीला आलं बोंड

खत पाणी फवारुनं

फिके पडले रे तोंड

माय निंदते तासालं

बाप महा घाली ढोस ।। अरे...


जीव तुला रे लावून

खस्ता उन्हात खाऊन

कुणब्याच्या शेतावर

बाप हाणतो गोफण

आलं आलं बहरुन

कसं पीक भरघोस ।। अरे...


सोनं पांढरं मानून

तुला शेतात पेरलं

सरकार दादा मला

कारे तुवा फसवल

भरघोस दिसे पैसा

पोटा मह्या उपवासं ।। अरे...


असं कसं सरकार

याला येईना कदर

सर्जा राजाची रे जोडी

बाप विकतो उधार

झालं गाव सामसूम

बाप घेई गळफास ।। अरे कापूस कापूस


Rate this content
Log in