STORYMIRROR

Smita Murali

Others

2  

Smita Murali

Others

अपरिचित

अपरिचित

1 min
380


जन्माला आले तो पहिला क्षण

अपरिचित सृष्टीचा कण अन् कण

अनुभवातुन सुटलं एक एक कोडं

मायेची माणसं वाटली गोडं


समजावुन घेतली जगण्याची कला

प्रश्न या वाटांवरती पडत होते मला

काही दुःखाचे काही सुखाचे

प्रसंग अनुभवले नानातरांचे


जोडत होते अनेक नाती

आयुष्याच्या टप्प्या टप्प्यावर

काही नाती घर करत होती

ह्रद्याच्या कप्या कप्यावर


आयुष्यचक्र हे असच चाललं

नवं नवं ज्ञान मिळतच राहिलं

मनाच्या तळाशी डोकावून पाहिलं

मन तर आपलं अपरिचित वाटलं


मनात होता भावनांचा गुंता

असंख्य लपल्या होत्या चिंता

मनातच त्यांच उत्तर भेटलं

गुंता न् चिंता व्यर्थ हे पटलं


शब्दांचा सापडला मोठा खजाना

शब्दांशी जोडल्या मनातल्या भावना

कवि जगांशी परिचित झाले

अपरिचित जगात रमुन गेले.


शब्दांचा सहवास हवासा वाटे

नव्या कवितेतून कविमन भेटे

अपरिचित दुनियेचे नवे तराणे.

कवितेत जगावे जीवन गाणे.



Rate this content
Log in