अपेक्षाभंग
अपेक्षाभंग
1 min
13.5K
सांग जीवना तुझे रंग किती
जगण्याचे मार्ग अन् ढंग किती
दुःख रोजची आम्हा नव-नवी
जुन्या शस्त्राने लढावी जंग किती
भुक झाली हाडवैरी आमची
तिने दिले जीवघेने प्रसंग किती
मरणास जगण्याची आशा अन
जळण्यास आतूर हे अंग किती
स्वातंत्र्य असून लाचार आम्ही
झाला आमचा अपेक्षाभंग किती
