अनवानी
अनवानी
1 min
1.1K
आईच्या पोटी जन्म
घेते लेकरु अनवानी
मऊ मऊ कापूस जसा
लोभस गोंडस स्पर्शानी
अनवानी असते माया
अनवानी असते वात्सल्य
यशोगाथा ही अनवानी
अनवानी परभवाचे शल्य
झिजुन जाते शरीर
घाम झिरपुन झिरपुन
प्रेमही असते अनवानी
पाखरांची घरटी फुलवून
कोण नाही अनवानी इथे
येणारा जाणारा अनवानी
संसार रुपी मोहमायेला
जोडुया संतवानीनी
व्रुक्षवल्ली ही अनवानी
वन्यजीव ही अनवानी
अवघि सृष्टि ही अनवानी
अनमोल जीवन ही अनवानी
अनवानी पायचं शिखर गाठतात
रक्ताळलेल्या जखमेवर फुंकर घालतात
जीवनाच रहस्य उलगडतात
समाजसेवेची धुरा तेच सांभाळतात
