STORYMIRROR

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

अनुभव...!

अनुभव...!

1 min
13.4K


दाम करी काम वेड्या

दाम करी काम....!


प्रेमासाठी सुकवू नको तू

फुका फुकी आपला घाम

दाम नसता होतो वेड्या

प्रेमाचा चक्का जाम......१


आई बापाची लेक लाडकी

नजर तिची रे सदा वाकडी

त्याहून बरी झाडावरची

उड्या मारणारी ती माकडी.....२


बाप पाही सद्गुणी मुखडा

आईस आवडे पैसे अडका

समजतात ते सुका दोडका

गोंजारून रे पांढऱ्या बदका.....३


नको वाटेल मग प्रेमाचा

मार्ग खडतर रे सटविचा

रस्ता बरा जुन्या वळणाचा

घास मिळण्या अंगवळणीचा.....४


अनुभव सिद्ध ज्ञान हे

असे कोणी देत नाही

ठेच लागल्याविण इथे

अक्कल ठिकाणे लागत नाही.....५


करावा लागतो पाठपुरावा

ध्येयासाठी आपल्या कष्टाचा

खरेच आहे त्रिकाल सत्य हे

दाम पुरतो रे सदा बाबा घामाचा.....६



Rate this content
Log in