अंतर्यामी....!
अंतर्यामी....!
समस्त समृद्धीच्या मोहात अडकलेल्या पिलांच्या पालकांची मनोकामना चार ओळीत.....!!!!
अंतर्यामी...!!!!!
पैसा अडका मान मरातब
सारे असता कणवटीला
तरीही सुख का येत नाही
अजूनही माझ्या भेटीला
संसाराची घडी बसविता
पाखरे मोठी झाली क्षणात
दाणा पाणी बहू असता
पाखरू येईना माझ्या रानात
काय सांगू देवा तूला
काय वाटते आज मला
येईना का तुला कळवळा
काय उपयोगाचा रे हा मळा
दूर उडुनी गेले पाखरू
मृगजळ पाहुनी समृद्धीचे
खरेच कोते आहे का हे
दर्शन त्याच्या बुद्धीचे
दुरावले जरी पाखरू
माया नाळ अतूट आहे अंतरी
नाही देवा तव कृपेने
जीवनी या मी अधांतरी
कृपा सदैव अशीच राहू दे
देवा आम्हा लेकरांवरी
भेट होऊ दे पिलांची
घेऊन ये त्यांना तू माघारी.....!!!!
