STORYMIRROR

Raosaheb Jadhav

Others

5.0  

Raosaheb Jadhav

Others

अंगी निंबुरली पोर...

अंगी निंबुरली पोर...

1 min
544


अंगी निंबुरली पोर...


रंग घेऊन नभाचे

अंगी निंबुरली पोरं

तिच्या शिरला पायात

वीज डसलेला मोरं...


सांडे डोळ्यांतून तिच्या

रान काजव्यांचे थवे

त्याचे चटके दुधाळ

पीक अंतरी साठवे...


कापे आत सळसळ

पाना चिकटले ऊनं

तिथं उडती भरार

पंख पापण्या होऊनं...


उरी उमाळा बावरा

कान सादाला झेलतो

रावा आकाशीचा आता

सल पाण्याशी वाटतो...


दुधी कणीस चिकाळ

तिला घालतसे साद

भरलेला कानी तिच्या

पाय फसणीचा नाद...


-रावसाहेब जाधव.


Rate this content
Log in