STORYMIRROR

Anil Date

Others

4  

Anil Date

Others

अंदाज

अंदाज

1 min
27.3K


मी जसा पाहिला तसा तो आज नव्हता

बोलण्यासाठी त्याच्याकडे आवाज नव्हता


राजाच झाला कंगाल राजदरबारात

पुर्वीसारखा त्याचा आज मिजाज नव्हता


कुठले ते गीत, कुठला तो राग गीताचा ?

आज संगितात कुठलाच साज नव्हता


कुठले त्याचे कुळ ? कोणता त्याचा वारसा?

सांगत असला जरी , तो घरंदाज नव्हता


अजून कळला नं त्याला जीवनाचा अर्थ

अश्वस्थाम्यासारखा त्याचा अंदाज नव्हता


Rate this content
Log in