STORYMIRROR

काव्य रजनी

Others

4  

काव्य रजनी

Others

अनाथ

अनाथ

1 min
24.2K

झोपडपट्टीतील ही अनाथ लेकरे

 सहारा नच मिळे याजं कोणाचा 

हरवले छत्र अकाली पालकांचे

काय गुन्हा होता यात लेकरांचा


कचरा कुंडीत टाकलेले शिळेअन्न

खाऊन ही लेकरे जीवन कंठतात

अन्नान अवस्था झालेली बघुन ही

सर्वजण मात्र डोळे झाकतात


कधी असते छप्पर डोईवरी

कधी तेही काढून घेतले जाते

उपेक्षीतांसारखे जीणे त्यांचे

कोण होतील त्यांचे अन्नदाते


कोण होतील त्यांचे आश्रयदाते

अनाथांचे जीवन ते जगतात

कोण घेईल कुपोषितांची जबाबदारी

कोण देईल त्यांना आपुलकीचा हात


भयाण, विदारक स्थिती त्यांची

बघून काळीज तुटु लागते

एखादी सामाजिक संस्था काढून

वाटते आपणच होऊ त्यांचे आश्रयदाते


शिकून मोठे होतील या संस्थेत

मिशनरी वृत्तीने करूया हे कार्य

गुन्हेगार होण्याआधी करुया खट पट


माता-पित्याचे हरवले छत्र अन्

अकाली अनाथपण नशिबी आले

नव्हता जरी त्यांचा त्यात गुन्हा

समाजाने मात्र त्यांज धिक्कारले


कोण भरवील दोन सुखाचे घांस

कोण देईल ओलावा प्रेमाचा

कोण बरे घेईल त्यांचे पालकत्व

कोण देईल त्यांना हक्क जगण्याचा


भयाण, विदारक स्थिती पाहून

काळीज आपले विदिर्ण होते

 खरेच उपेक्षितांसम जीणे त्यांचे

कोण त्यांना समजून-उमजून घेते


नाही समाजास यांची कदर

मग कोण देईल आधाराचा हात

इवल्याश्या जीवांना सहारा देवून

कोण निभावेल यांची साथ


अनाथ या मुलांना दत्तक घेऊन

कोण आयुष्यात रंग भरणार

रोटी,कपडा,प्रेम शिक्षण देवून

कोण त्यांना उत्तम घडवणार


आपणच! हो आपण समाज

त्यांचे पालकत्व नक्की घेणार

शिक्षण-सुसंस्कार करून त्यांना

देशाचे उत्तम नागरिक घडवणार


এই বিষয়বস্তু রেট
প্রবেশ করুন