STORYMIRROR

Prashant Shinde

Others

4.7  

Prashant Shinde

Others

अन मनोगत , गगन भरारी!

अन मनोगत , गगन भरारी!

1 min
13.3K


अन मनोगत

गगन भरारी....!


एवढा मोठ्ठा आवाका

सांभाळता सांभाळता

मोठी दमछाक झाली


विश्रांतीस कधी

आम्हाला

वेळ नाही मिळाली


श्वास घेण्याच्या

वेळेतच गनिमाने

मुसंडी मारली


तेंव्हा गस्त

घालण्याची पाळी

आमच्यावर आली


दुष्काळाच्या छायेने

सारी धरणी दुभंगली

कमळ कोमेजून भेगाळली


आता लांब पल्ल्याची

झेप घेण्यासाठी

मतांच्या पावसाची वाट पाहू


पुन्हा दलदलीतून

वेळ येता भाग्याची

पुन्हा इथेच कमळ फुलवू


हार जीत खेळ

ताकद आजमावण्यासाठी

खेळून पाहिला


लक्ष न देताच

दैवाचा फासा टाकून

एक डाव भुतास अर्पण केला


आता परीक्षण करतोय

नव्या जोमाने याच मातीत

मतांचा पाऊस पाडण्यासाठी


सुपीक जन मत धरणीत

आपले कमळ रुजवण्यासाठी

सौभाग्याचे कमळ पुन्हा फुलवण्यासाठी..!


Rate this content
Log in