अमृत
अमृत
1 min
642
सारा मिरुग सरला
नाही पावसाचा थेंब
कसे जगातिल माय
अंकुरले सारे कोंब
रोप लहान अजून
जीव कासाविस असा
सोड पान्हा अमृताचा
मेघा बरस जरासा
वर्षावानं अमृताच्या
न्हाऊ घाल धरणीला
तरारेल पिक सारं
मनी उधाण बळीला
वाहतील मनसोक्त
झरे कडे कपारीत
वारे गातील मंजूळ
पिक डोलेल खुशीत
