अमावस्येची चांदरात
अमावस्येची चांदरात
1 min
563
शून्यालाच शोधायचो मी
न जाणे कित्येक समीकरणात,
जसं काही मिळणारच होतं
इंद्रधनुष्य मला या अंधःकारात
अंधःकाराचे साम्राज्य हे
मी कसे तरु सांग ना,
शून्याच्या या समीकरणाला
कसे सोडवू सांग ना
ह्या काळोख्या रजनीला
चंद्र नाही माझ्या आसमंती,
परंतु तू जर असशील सोबती
अमावस्याही उजळतील होऊनी चांदराती
तर सांग सखे
अश्या ह्या अवसेच्या चांदराती,
दाखवशील का मज सप्तरंग
होऊनी इंद्रधनु माझ्या आसमंती???
