STORYMIRROR

Kshitija Kulkarni

Others

3  

Kshitija Kulkarni

Others

अख्खे शिवार

अख्खे शिवार

1 min
143

सर्जा राजाचा दिन झाला सुरू

बघा कसं वाजतं गळयातलं घुंगरू

अन्नदात्याचा साथीला साथ बघ देती

भल्या पहाटे जोडी नांगरायला जाती

एकाचे हात दोघांचे पाय राबून

धान्य पिकती जमिनीत पाय रोवून

उभ्या पिकात उन्हात करपून तरी

आख्खे शिवार डोलतं लई भारी

धरणीमातेला सूर्य देई उर्जित साज

कष्टाचे फळ मिळे दोघांना आज


Rate this content
Log in