STORYMIRROR

Sarita Sawant Bhosale

Others

3  

Sarita Sawant Bhosale

Others

अजब हे सरकार

अजब हे सरकार

1 min
453

अजब हे सरकार,अजब हे सरकार

खुर्चीवरच यांचा जीव फार

महागाईने केली हद्दपार

सगळीकडे पसरला नुसता भ्रष्टाचार सामान्यांच्या डोळ्यात पाणी आणतो कांदा पूर,दुष्काळाने शेतकरी वाहतो अश्रुधारा बेरोजगारीत अडकली तरुणाई

इंजिनिअरही चहाची टपरी टाकी

चिमूरडा जीव असो की वृद्ध बाई ठरते अत्याचाराचा बळी

आरोपी मात्र होतो फरारी

फीचा आकडा गगनाला भिडी

शिक्षणाची इच्छा स्वप्नातच पूर्ण होई

परीक्षेला इथे बसतो डमी

ज्ञानीला नाही नोकरीची हमी

किंमत ना इथे प्रामाणिकपणाची

धुंदी फक्त सत्तेची

पर्वा ना या हिरवळीची केली अंधारात

मुक्या झाडांनी आसवे गाळली

किती केला जरी धिक्कार तरीही

अजब हे सरकार अजब हे सरकार

खुर्चीवरच यांचा जीव फार


Rate this content
Log in