STORYMIRROR

गोविंद ठोंबरे

Others

4  

गोविंद ठोंबरे

Others

ऐकलंत का राजे...

ऐकलंत का राजे...

1 min
27.3K


ऐकलंत का राजे मला मी तुमचा मावळा बोलतोय,

स्वराज्य उभारलं असेल तुम्हीं पण मी कोण्या भलत्यालाच माझं दैवत अन जाणता राजा म्हणतोय..


जिंकलेत हो राजे तुम्ही हर हर महादेवाच्या नाम घोषात कित्येक तख्त अन गड-किल्ले,

इकडे मात्र हर हर पुढे कोणालाही जोडत विकलेत आम्ही स्वाभिमानासकट तालुके अन जिल्हे..


परधर्मीय स्त्रीला तुम्ही राजे माता म्हणून पूजलेत,

अन इथे आमच्या बहिणीची अब्रू लुटली असताना आम्ही तीची जात पाहून मोर्चे काढलेत..

वाघाच्या बच्चाला जन्म देऊन तुम्ही एका पंडीत शूर वीरास घडवलेत,


आम्ही मात्र लेकरांहाती भलतेच झेंडे देऊन तुमचे मावळे नासवलेत..

दोन तिथीच्या दोन जयंत्या काढून तुमच्या पुढे डीजे घेऊन नाचलोय

अन बापाच्या श्राद्धाच्या पैशासाठी म्हाताऱ्या आईपुढे भावासोबत भिडलोय..


माहितीये का राजे तुमचं स्मारक या अथांग समुद्रात उभं करतोय,

अन तुमच्या प्रत्येक गड-किल्ल्याची माती आम्ही आमच्या घरासाठी उकरतोय..

ऐकलंय का राजे तुम्ही तुमचा गुरू आम्ही तुमच्या पासून पळवलाय,

जाती जातीत गुरू दक्षिणा करून अस्तित्वासकट

त्यांचा पुतळा पुरलाय..


तुम्ही भेटायला गेलेल्या संतांचंही तेच करायचं होतं बरं का राजे आम्हाला,

वारकरी धारकरी बनवून दिंडीतच फोडायचं होतं सगळ्यांला..

राजे पहा तुमच्या स्वराज्याचा किती बदल घडवलाय आम्ही मावळ्यांनी,

तुमच्या सकट विकत घेतलाय अख्खा मुलुख आमच्या राजकारण्यांनी..


तुम्हालाही आता वाटत असेल उगीच मावळ्या तुला घेऊन लढलो,

स्वराज्य उभा करताना मी तुझ्यासाठीच का सगळंकाही जिंकलो..

सांगा तुमच्या माँ जिजाऊंना या म्हणा एकदा परत नांगर घेऊन,

अन उलथून टाका म्हणा दिल्ली सकट उभ्या हिंदवी स्वराज्याची सीमा उभे राहून..


Rate this content
Log in