अग्नी लपेट...!
अग्नी लपेट...!
1 min
8.8K
वणवा पेटला उरात
निघाली इतिहासाची वरात
नाचले घोडे कित्येक
दाखवण्या कर्तब अनेक
त्यातील एक माझे
नाचले घोडे मनात
शिरशिरी भिनली अंगात
शिरता वारे तनात
हुरहूरले मन अंतरात
काहूर उठले काळजात
आठवले सारे पळभरात
जाळले ते मी क्षणात
होण्या शांत निमिशात
पुन्हा सज्ज झाले मन
ताणले आनंदे तन
प्रश्न होते अनेक गहन
सोसले ज्यांनी मरण
ठेविले गहाण वर्तमान
फुलण्या पुन्हा आनंदनवन
सौख्य समाधान शांतीचे
पाहण्यास तेजोमय आनंदी त्रिभुवन....!
