STORYMIRROR

sarika k Aiwale

Romance Tragedy

3  

sarika k Aiwale

Romance Tragedy

अधुऱ्या स्वप्नांची कहाणी

अधुऱ्या स्वप्नांची कहाणी

1 min
228

एक रात्र असते नित्य सोबतीला 

अधुऱ्या स्वप्नांची कहाणी सांगायला 

सर पावसाची व्याकूळ बरसायला 

अबोल बोल मनीचे गूज सांगायला 


एक रात्र असते नित्य सोबतीला 

अधुऱ्या स्वप्नांची कहाणी वाचायला 

कोण जन्मीचे नाते अनामिकेला 

सांगत होते भाकीत तिच्या प्रेमाला 


एक रात्र असते नित्य सोबतीला 

अधुऱ्या स्वप्नांची कहाणी सजवायला 

पापणीत ओल्या साठवणी घ्यायला 

ओंजळीतले तिचे अश्रु पुसायला 


एक रात्र असते नित्य सोबतीला 

अधुऱ्या स्वप्नांची लाट पहायला 

सागराच्या साथीला वादळच्या वार्याला 

लहरीच्या स्वैर वाहण्याला गती द्यायला 


एक रात्र असते नित्य सोबतीला 

अधुऱ्या स्वप्नांची कहाणी पूर्ण करायला 

रात राणीच्या गंधातुन फुलायला 

चाफ्याच्या सुगंधात स्वत: हरवायला 


एक रात्र असते नित्य सोबतीला 

अधुऱ्या स्वप्नांची कहाणी सांगायला 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance