अधिकार
अधिकार


ओळख असताना, अचानक भेटलो
मुकेपणाची भाषा, पोट भरून ती बोललो
काय बोलावं या वेळी, फक्त एवढाच विचार चालू
नजरेची नजरकैद खरी, पण फक्त मौन पाळू
शांतता ती खरी, एक वेगळेच तुफान होते
एकमेकांना पाहणे हेच, शब्दांना पर्याय होते
वेगळेच जग उभे होते, आज माझ्या समोर
सगळ्या वेदना गोड झाल्या होत्या, वाटत होत्या ज्या कठोर
प्रश्न व्यक्तीत्वाचा होता, मी मागे सरलो
कमीपणाच्या प्रश्नाला, मीच आज हरलो
वाईट किंवा आनंद, हे तर कारण होतं फक्त
चुकीच्या वळणाला, चांगल्या प्रत्येक रस्त्याची सक्त
जाळ ओकते लेखणी आज, माझ्याच विरोधात
थोडा का होईना खरा होतो, काळजीच्या अधिकारात