अधांतरी...!
अधांतरी...!
1 min
1.1K
अधांतरी......!!!
अधांतरी जीवन आपले
तरीही मूळ धरून आहे
त्या मुळावर विस्वास अपला
आजही टिकून आहे
फुलले जीवन सारे
बुडाशी काही नसता
दृढ विश्वास जगण्याचा
अंतरी अढळ असता
माया सारी त्या प्रभूची
जाणली मी माझ्या मनी
कोणी काही म्हणो जनी
तोच खरा माझा धनी
सांभाळ करी माझा
कवेत घेऊनि सदा हरी
सुखे जीवन जगतो मी
आता जीवनात नो हरी नो वरी
तो माझा मी त्याचा
हेच सत्य धरणीवरी
कृपा ज्याची माझ्यावरी
तोच सदा अंतरी श्रीहरी....!
