Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

अभ्यास....!

अभ्यास....!

1 min
258




अभ्यास एक समस्यां

घरो घरी भेडसावते

कारण नसताना

उगाचच सतावते


मुलं ऐकत नाहीत

अभ्यास करत नाहीत

सारख खेळत असतात

मोबाईल घेऊन बसतात


घरच काम करत नाहीत

नम्र पणे वागत नाहीत

लक्ष घरी देत नाहीत

पालकांना मान देत नाहीत


अशा अनेक तक्रारी

तोंडाची कादिन घेतात भाकरी

वाटते कधी कधी

आपणच का करावी यांची चाकरी


मी माझी नोकरी बरी

पोर पाहतात छोकरी

पोरांची वर्तणुक छपरी

फिरतात पाहून झिपरी


एकच प्रश्न यांचं

आता करायचं काय

केंव्हाही करू पाहतात

घराला आपल्या बाय बाय


उत्तर आपल्यातच मला

दडलेलं दिसलं

जेंव्हा माझं मला

तारुण्य क्षणात आठवलं


स्वातंत्र्य प्रिय जीव हा

आपली जबाबदारी आपणच जाणतो

त्या साठी उगाचच आपण

वाळली उठाठेव करतो


मुक्त करा मुलांना

आचारा विचारांनी

मोकळा श्वास घेऊ द्या त्यांना

मोकळ्या आपल्या मोठ्या मनांनी


त्यांची तीच आपोआप सुधारतील

आपली जबाबदारी आपणच घेतील

आपलं प्रत्येक स्वप्न साकार करतील

मजबूत पणे जीवनात आकार घेतील.....!



Rate this content
Log in