अभंग
अभंग
1 min
3K
पाहता पाहता
श्वास हे अडले
भान हरपले
तुजवरी
मीनाक्षी सम तू
रुप हे सोनेरी
काया ही चंदेरी
खूळ लावे
केस हे रेशमी
ओठ हे डाळिंबी
नाक चाफेकळी
ठार झालो
बोलतसे विशू
स्वर्गाची ललना
इंद्राची अप्सरा
मदनाची रंभा
भासते तू
