Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sakharam Aachrekar

Tragedy

4.9  

Sakharam Aachrekar

Tragedy

आयुष्याशी विरह

आयुष्याशी विरह

1 min
72

ओळखू न शकलो एकही, मी ओळ माझ्या रचनांची

ते पान माझ्या शब्दांचे केव्हाच हरवले होते

शोधूनही ना सापडल्या मजला, रंगछटा इंद्रधनूच्या

ते काळ माझ्या स्वप्नांचे, मीच सरवले होते

अश्रूंत मीच माझ्या इतका, होतो सचैल न्हालो

हृदयसागरातून हे शब्द माझ्या, आपोआप उसळले होते

संवाद आपला रोजचा, गोठून कोठे गेला

कवाड आज आपल्या मनांचे, आकस्मिक निखळले होते

पहिली तुझी शिल्पे, कधी मीच कोरलेली

पाषाण त्यातले काही मातीत मिसळले होते

रंगविल्या मी तुझ्या मैफिली, घेऊन सवे जगाला

पुरस्कार इथे मज एकांताचे, कित्येक गवसले होते

पाऊस काल शहरात सार्‍या, बहार सांडून गेला

बाग माझ्या फुलांचे मी, आसवांनी फुलवले होते

सांग कसे सांगू जे, सांगायचे होते तुला

अधिकार तुझ्या आयुष्यावरचे, मी केव्हाच गमावले होते

Rate this content
Log in