आयुष्याच्या रंगमहाली
आयुष्याच्या रंगमहाली
1 min
439
स्वप्नामध्ये गेले एकदा आयुष्याच्या रंगमहाली
वाढला ह्रदयाचा ठोका झोका होता वर खाली
बालपणीच्या दालनात होती टवटवीत फुले
वाऱ्यासंगे फिरताना मन आनंदाने स्वैर डुले
सुगंध फुलांतून शोषिता लोटला हा भरभर काळ
यौवन अंगी फुलून येता गळ्यात ग पडली माळ
वाटेवरच्या फुलांची जागा घेतली बोचऱ्या काट्यांनी
सज्ज खडतर प्रवासाला इच्छा मारुन मुकाट्यानी
सुख दुखा:चे नाना चटके बसले कोवळ्या मनावर
हळूवार फुकंर घालत मग पोहचले हो पैलतीरावर
धापा टाकत टाकत आले दिवस सरणावर जाण्याचे
आठवांचा घेऊन पसारा निसर्गात विलिन होण्याचे
