आवळा...!
आवळा...!
1 min
12.4K
डिश आवळ्याची पाहून
तोंडाला पाणी सुटतं
आरभट चरभट
खाणाऱ्यांचं बिंग फुटतं
काय म्हणतील
या भावनेने घोड अडतं
आणि बेलगाम होऊन
तुटून पडतं
खाद्यच अस हे आपलं
बाल पणाच मौलिक
याला ना भीड ना बाड
ना समाज मताची चाड
हिंगाचा खमंग वास
मैत्रीचा गोड सहवास
वरून मिस्कील अशी
तुकटुकची चपराक
झालं गेलं गंगेला मिळालं
पुन्हा बालपण समोर आलं
आवळ्याच्या रुपानं
ते मी मनसोक्त साजरा केलं...!
