STORYMIRROR

Sunita Anabhule

Others

3  

Sunita Anabhule

Others

आवडत नाही मला.....

आवडत नाही मला.....

1 min
239

आवडत नाही मला, असं तुझं वागणं,

येते येते म्हणणं आणि वाट पाहायला लावणं !

आवडत नाही मला, माझ्याशी फटकून वागणं,

इतरांशी मात्र खिदळून आनंदान बोलणं !

आवडत नाही मला, असं एकट माझं भटकणं,

सदा मला दुर्लक्षून घोळक्यात तू हिंडणं !

आवडत नाही मला, आपला संवाद न होणं,

तुझ्या दर्शनासाठी माझं तीळ तीळ तुटणं !

आवडत नाही मला, असं बेफिकीर वागणं, 

आकंठ प्रेमात बुडवून जीवाला तरसवणं !

आवडत नाही मला, माझा चंद्र दुसऱ्यांनी पाहणं,

आणि कुणी माझ्या चंद्रासाठी झुरणं ! 


मला फक्त आवडतं, तुझं रुप लोभसवाणं, रातराणी परी मोहवून जाणं !


Rate this content
Log in