Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Ajinkya Guldagad

Others

2.5  

Ajinkya Guldagad

Others

आठवत रे मला....😊

आठवत रे मला....😊

1 min
342


काल रात्री आकाशात असच....चांदण्या मोजत बसलो होतो....

निखळणाऱ्या सर्व ताऱ्यांजवळ... फक्त तुलाच मागत होतो...

सहजच वाटलं रुसणं,फुगण तुझ्यावर...कधी मला जमलंच नाही....

वेड मन हेही माझं....दुसरं कुणात रमलच नाही...

स्वप्न तुझी पहाताना मला कधी,रात्र रात्र पुरत नाही....

टीमटीमणाऱ्या काजव्याने...आठवण क्षणाचाही पुसत नाही...

समोर असताना तू खरंच... मनाला खूप बरं वाटत...

क्षणिक नजर जरी तुझी पडली.... डोळ्यांचं सर्व पारणं फिटत...

तासन तास तुझी वाट बघत...जेव्हाही मी बसायचो....

हलक्याश्या नजरेसाठी तुझ्या...खूप झळ सोसायचो...

वेणीतल्या गजऱ्याच फुल तुझ्या...कधीतरी मीही तोडायचो...

पण तुला वाटायचं की मी....मुद्दामच केस ओढायचो..

दोघे कधी तासन तास.. गप्पा मारतही बसायचो....

किती वेळ गेला म्हणून....खूप हसत बसायचो....

आठवत मला एकदा पावसात....कितीतरी तू भिजली होतीस....

चिंबचिंब बघतांना तुला.... लालबुंद लाजून बसली होतीस..

तुलाही आठवतं किती असायचो....भेटीसाठी मीही व्याकुळ....

पण तुझ्यासोबत कायमच असायचं तुझ्या...मैत्रिणींच गोकुळ...

वाढदिवसाला तुझ्या तू....किती बरे नटली होतीस...

डोळ्यांत डोळे दिपावलेस न तू...तेव्हा सर्व हाउस फिटली होती....

बऱ्याचदा बोलता बोलता....सर्वच विषय संपून जात....

निरभ्र आकाशाखाली मग बसायचो....फक्त एकमेकांना पहात....



Rate this content
Log in