STORYMIRROR

Kishor Zote

Others

3  

Kishor Zote

Others

आठवणीतल्या श्रावणसरी

आठवणीतल्या श्रावणसरी

1 min
30

श्रावणसरी कशा

अलगद पडायच्या

हिरव्यागार सृष्टीवर 

चमचम चमकायच्या....१


लपंडाव ऊन-पावसाचा

मजेशीर असा वाटायच्या

इंद्रधनु नभी पाहताना

ताल धरून नाचायच्या....२


रिमझिम बरसात

हिंदोळा झुलायच्या

बैलपोळा फुटताना

रप रप त्या पडायच्या....३


काळयाशार जलात

तरंग त्या उठवायच्या

मनाचा गुंता असा

अलगद सोडवायच्या....४


श्रावणसरी आठवणीतल्या

हृदयी जरा जपुन ठेवायच्या

मनाच्या त्याच भाव भावनांना

ओले ओले चिंब मग करायच्या....५


இந்த உள்ளடக்கத்தை மதிப்பிடவும்
உள்நுழை