आठवणीतला गाव
आठवणीतला गाव


गाव माझे प्रेमळ आहे किती छान,
आहे गाव आमची शान,
आहे त्या गावी माझे घर
पण त्या आठवणीत गाव माझा राहिला दूर.
माझी गावातील ती शाळा आहे खूप सुंदर,
मन झाले तीला पाहण्यासाठी आतुर.
पण त्या आठवणीत गाव माझा राहिला दूर.
मन गाई गीत गावाचे, सार्थकी जीवन आमचे मनातून गात रहावे ते सूर.
पण त्या आठवणीत गाव माझा राहिला दूर.
खेळ आठवतात ते मैत्री सोबत खेळायचो, बेभान होऊन गावी फिरायचो.
हे आठवून दाटून येतो ऊर, पण त्या आठवणीत गाव माझे राहिले दूर.
सुखाचे क्षण आहेत त्या माझ्या जन्मभुमीचे,
माझी माणसे आहेत त्या प्रेमळ गावची.
नात्यांची जोडतात मायाळू दोर, पण त्या आठवणीत गाव माझा राहिला दूर.
मन रमलयं त्या गावी,
पण गाव मात्र राहिलाय डोंगराआड दूर,
नाही दिसत ते माझं गाव, फक्त आठवणीत गातेय त्या क्षणांचे सुर,
पण त्या आठवणीत गाव माझा राहिला दूर.
पण त्या आठवणीत गाव माझा राहिला दूर.