आठवणींच्या हिंदोळ्यावर
आठवणींच्या हिंदोळ्यावर

1 min

87
मलाही आज झुलायचंय
आठवणींच्या हिंदोळ्यावर,
मजा येईल खरी सजणी
सोबत तू असशील तर
विसरून जाऊ जीवन दुःख
सुखाचे सारे मोजू क्षण,
देऊ-घेऊ आनंदी आनंद,
जीवनाचं करूया सोनं
आठवणीच्या हिंदोळ्यावर
मला हवी तुझीच साथ,
दोघेच या जीवनात सदा
दोघेच नित्य सुख-दुःखात
मी किती गाऊ गुण तुझे
तुला काय सांग हवे,
तुला देतो चार झोके
तू ही मला चार झोके द्यावे
येती साऱ्याच आठवणी
झाला आनंद मज फार,
झुलायचे दोघे आपण
आठवणीच्या हिंदोळ्यावर