काव्य रजनी

Others


4.0  

काव्य रजनी

Others


आठवण

आठवण

1 min 11.8K 1 min 11.8K

स्पदंनाला थांबण्याची सवय

तुझ्या विरहानेच लावली..दिसता एका किना-यावर तू 

मला सोडून स्पंदने तुझ्याकडे धावली......

भेटीचे हे क्षण हातातून अलगद निसटून जातात

रात्री झोपताना एकांतात आठवणींचे वारे वाहतात


पापण्या जरी मिटल्या असल्या तरी अश्रु त्यात लपत नाही.....

विरहाच्या क्षणांच्या याआठवणी मी जपत नाही......


लग्नाआधी प्रेमिकांसाठी प्रेमच खरी दौलत असते.......

लग्न झाल्यावर कही वर्षानी मग त्या प्रेमाचीच उणीव भासते......


सगळ काही संपलय आता अश्रुही थांबले आहेत

राहून राहून अनेक वेळा माझ्याशी भांडले आहेत


मनच आता काठावर आलय जगल एकदाच

जेव्हा गटांगळ्या खात होत सावट होत भीतीच


माझ्या बाबतीत नेहमीच ही गोष्ट घडत आली

आशा अपेक्षाचा चक्काचूर होत एक एक

घटना सरत गेली


वेध घेतला सुरुवातीला शंकेने मन ग्रासले

माहीत असूनही पडले खोलात शेवटी अश्रुवाटे सोसले


ज्या गोष्टीसाठी चरफडले पहात होते नुसतीच वाट

डोळे सुद्धा थकून गेले मन घालत होते थांबण्यासाठी घाट


रोजची माझी झोळी रिकामीच राहात होती

परिस्थिती वचनाला विसरून माझ्याविरुद्ध वागत होती


किती तरी वेळा त्या आठवणी नुसत्याच उकरायचे

एक वेडी आशा समजून स्वप्नात त्यांस साकारायचे


माझ्याच आयुष्याशी भांडण हे रोजचच झाल होत रडगानं

किती तरी दिवसांचा दुरावा होतच नव्हता सहन


शिल्लक आता काहीच नाही मनात काहीच येत नाही

जुन्या स्मृतीच्या वार्‍या देखील मनाला भेदुन जात नाही


दु:ख आता खूपच झाल विचार सुद्धा शमले आहेत

सगळ काही संपलय आता अश्रुही थांबले आहेत


Rate this content
Log in