आठवण
आठवण
प्रिय दादास,
तू होतास तेव्हा किती
आधार होता मला
संगतीत तुझ्या रे दादा
काही भीती नव्हती जिवा
यश मिळता परीक्षेत कौतुक तू केले
चूक होता माझी काही रागे मज भरले
मन भटकता मार्ग तू दाविला
अडचणी येता मज काही दिला योग्य सल्ला
तुझ्या संगतीत रमले होते जीवन
सहवासात तुझ्या रे दादा जगले
अनेक आनंदाचे मी क्षण
तुझ्यामुळे तर मी घेतले पुढील शिक्षण
आठवण येते तुझी मला क्षणोक्षण
दिलीस मजला नेहमीच चांगली शिकवण
तुझ्यामुळे तर आहे आज माझे मी पण
रक्षाबंधन नि भाऊबीजेला तर
खूपच येते आठवण
आता झाला आहे तू नजरेआड
पण खरं सांगू का तुला
तुझा फोटो मात्र मनात
जपलाय जीवापाड