आठवण प्रेयसीची
आठवण प्रेयसीची
1 min
583
आठवण प्रेयसीची
रुंजी मनाला घालते
मऊ मोरपिसापरि
अलवार तरंगते
तिचे कटाक्ष सूचक
गूज सांगून जाती
अनावर ओढ मनाची
त्याला सांगून जाती
तळ्याकाठी शांत निवांत
कळे सारे अंतर्मनीचे
नकोच शब्द शपथा वचने
शब्दांवाचून शब्दांपलीकडचे
प्रीत अशी फुलून येतसे
गंध मोगरा साक्ष देतसे
टिपूर चांदणे डोकावतसे
आठव मनात कोरतसे
