आठव..!
आठव..!
1 min
632
आठव....!
ती दिसली
पूर्व क्षितिजावर
निरव अशा आकाशी
अजूनही
किलबिलाट चिवचिवाटही
चालू झाला नव्हता
आठव झाला
ती पुढे मी मागे असाच
प्रभातफेरीचा सोहळा पार पडायचा
जस जसा
कमनीय बांधा लय धरायचा
तसाच हृदयाचा सूर जुळायचा
वर्णन कसले
बोडक्याचे करायचे आता
गेले ते दिन गेले
उरल्या त्या आठवणी
गोड मधुर
जीवनातल्या
मोरपंखी साठवणी...!
सुप्रभात.!
