आठव...
आठव...
1 min
643
अलवार गुंतते बावरे
हळवे मन काहीसे
गर्द आठवाच्या रानी
ऊगीच घेई वळसे
खुणावती मम अजुनही
क्षण ते हवेहवेसे
तुझ्या मिठीत अधीर
रुप खुलले साजेसे
तुझ्यासवे स्वप्नमहाली
रमताना मी जरासे
विसरले विश्व सारे
सुख लाभले पुरेसे
