आत्ताच सांगा!
आत्ताच सांगा!


अहो सांगा नीट सांगा
सांगा ठाम सांगा
तुम्ही माझ्या बाजूने
लढणार की नाही?
असेन मी इथेही
असेन मी तिथेही
असे गुळमुळीत उत्तर
मुळीच चालणार नाही!
जाणतो मी जोखतो मी
कोण आपला कोण परका
पण दगा जर द्याल तुम्ही
मी ही खूपच आहे बेरका!
करुन ठेवीन वाट मी अशी
नाही इथले नाही तिथले
चांगलेच पडाल तोंडघशी!
लक्षात ठेवा मग शब्द द्या
खेळू नका माझ्या भावनांशी
सांगा नीट सांगा
राहाल ना एकनिष्ठ
तुम्ही माझ्याशी!