आश्वासनांचे पेव फुटेल
आश्वासनांचे पेव फुटेल
आश्वासनांचे पेव फुटेल
घोषणा ऐकून डोके उठेल
खुर्चीसाठी मातब्बरांचा
हा तर मित्रा तंटा आहे .
अरे ही निवडणुकीची पहिली घंटा आहे !!!
चोर आता साव होतील
भामट्यांचेही भाव होतील
गावावरून ओवाळून टाकलेले
अमके तमके 'राव' होतील
एकमेकांच्या नावाने जोरदार आता शंख आहे
अरे मित्रा हा निवडणुकीचा पहिलाच तर अंक आहे
प्रासंगिक करारांचे ढोल ताशे वाजतील
त्याच्यापुढे बिचाऱ्या वारांगना लाजतील
चीअर्स म्हणत पुढारी कार्यकर्त्यांना पाजतील
मस्ती छान चढल्या शिवाय पुढचा अंक रंगत नाही
आणि असं करताना कुठलाही तत्व भंगत नाही
अर्धे इकडे अर्धे तिकडे -- 'जा, चला सुटा '
किती होवो जागरण पण वेळेवरच उठा
पंधरा दिवस नाटक वठवण्यासाठी झटा
नंतर आपण आहोतच पाच वर्षे बाप
जाओ म्हणो कोणी खुशाल विषारी हे साप
