आशीर्वाद...!
आशीर्वाद...!
1 min
9.0K
स्पर्धेला येताना
वेगळंच थ्रिल अनुभवलं
साक्षात परमेश्वराला
नटवायला मिळालं
शंकर काय गणपती काय
हे नटवतानाच समजलं
आशीर्वादाचा हात शंकराचा
पाहून खूप कुतूहल वाटलं
खरचं शंकरच मुलात
विराजमान झाल्या सारख वाटलं
आशीर्वादाचा हात पाहून
गड्या मनाचं समाधान झालं
वाटलं केलं कर्म सार फळास आलं
मुलांच्या रुपात
जेव्हा परमेश्वराच दर्शन झालं..!!
