आशा
आशा
1 min
11.5K
डोळे नको भरुस
होईल पहाट पुन्हा
रात्र नको जागवू
होईल प्रभात पुन्हा
मनातून दुःखी आहेस
हे मी जाणतो
त्यातूनही सुखाची फुटेल पालवी
हे मी मानतो
नक्कीच होईल क्षमा
हा नाही मोठा गुन्हा
एकांतात आज-काल
मी खूप बोलका होतो
मग तुझ्याशी मनसोक्त
मन भरून गप्पा मारतो
होईल समेट कधीतरी
हीच आशा मना