आस
आस
सारखा तूझा विचार, तूझाच चेहरा येतो समोर.
दाखवत मात्र कोनाला नाही, अभिनय करतो एवढा कठोर.
पहिल्या भेटीत तूझ थोडसं अवघडण, चोर चाहूल थोडसं बघणं.
माझ ही अगदी तसच होत, भलतीकडेच पहात थोडसं हसणं.
खरतर तेव्हाच भेटायचं होत, खुप काही बोलायच होत.
त्याच वेळी मनाला माहीत होत, गर्दीतल्या सगळ्या नजरा समोर लाजायच होत.
तूही स्तब्ध मीही स्तब्ध, सगळ्यांची चालू बडबड होती.
त्यांनाही माहीत होत की, कोणाच्या मनात किती गडबड होती.
परतीचा प्रवास खुणावत होता, पण मैफिल सोडण्याची इच्छा नव्हती.
पुन्हा भेटणार लवकरच होतो, त्याच क्षणाची आता फक्त आस होती.