आरश्यातील माझी प्रतिमा
आरश्यातील माझी प्रतिमा
1 min
41.7K
आरश्यात मी सहज पाहिले..
माझ्या *प्रतिमेने* माझ्याकडे बघुन खुदकन हसले.....
तिला मी हसण्याचे कारण नजरेनेच विचारले...
तिने तितक्याच मिश्कीलपणे उत्तर दिले....
रोज न्ह्याळतेस स्वतःला आरश्यात ....
कधीतरी माझ्याकडेही लक्ष दे
म्हणजे सापडेन मी तुलाच तुझ्यात...
कधी तू कठोर,कधी तू मृदु,कधी तू हसरी,कधी तू लाजरी .....
नेहमीच नव्या रूपात दिसतेस आरश्यात...
रोज नव्याने भेटतेस तु मला तुझ्या नव्या रुपात....
तुझीच आहे मी *प्रतिकृती* तुझ्यातूनच उभरते....
तुझ्या नव्या नव्या रूपात नव्याने निखरते....
