आर्जव...!
आर्जव...!
एक विनंती ऐका महाराज एकदातरी
आम्हा द्या हो सहभागाचा मान ।।धृ।।
स्पर्धा घेता वरचेवर फार
होतो बुद्धीला हो खार
होतो कवी कधी कधी बेजार
पाहून स्पर्द्धा अपरंपार।।१।।
परीक्षक हो फार हुशार
पाळती नियमावली साचार
त्यात संयोजकांचा घेती विचार
निवडती आपलेच दोन चार।।२।।
नवे भुलती सारे सुभेदार
सहभाग घेती म्हणुनी मजेदार
वाटते होईल नशीब एकदा उदार
देईल हाती प्रमाणपत्र एकवार।।३।।
पण कसले काय देवा भाग्य
जणू फाटक्यात पाय सद दुर्भाग्य
मक्तेदारांचेच खुलते सौभाग्य
राहतात नवे कवटाळीत पुन्हा दुर्भाग्य।।४।।
आता ऐक महाराजा विनवणी
पाहतो सारेच तो चक्रपाणी
रिमूव्हड ची जरी आली आणीबाणी
विचार मांडला सोडून हातावर पाणी
हीच आहे प्रत्येक स्पर्ध्येतली कहाणी।।५।।
एक विनंती ऐका महाराज एकदातरी
आम्हा द्या हो सहभागाचा मान ।।धृ।।
