आपण दोघे
आपण दोघे
कोण मी, तू कोण
आपण दोघे किनारे दोन
दोघात नसेल कधीही अंतर
तरीही चालू दोघे समांतर
घडेल भेट न भेटू जरी
ओढ ही राहील जन्मांतरी
नाते आपले नात्याविना
संवाद असतील शब्दाविणा
नावांमध्ये ना नाते जोखणे
असेच राहू दे सुंदर देखणे
तू माझी प्रेरणा अन् मी तुझा ध्यास
असेच असतील नेहमी निरंतर
बंध आपुले खास
श्वास आपुले एक जरी
देह केवळ दोन
तरीही आयुष्याच्या वाटेवरचे
आपण दोघे किनारे दोन...