आनंदी आनंद
आनंदी आनंद
1 min
46
ऋतू आला पावसाळा
धरतीला सजवाया
हिरवाई फुलवुनी
शालू भू ला नेसवाया.
काळे मेघ बरसता
झाली ओली चिंब धरा
कोंब फुटले उदरी
वाहे खळखळ झरा.
ताजी तवानी धरती
मेघ राजास नटली
नव युवती समान
मिलनास आतुरली.
शालू हिरवा धरेचा
कड्या कपारी भरला
धबधबे ते पाहुनी
हर्ष मनीचा फुलला.
सृष्टी बदल क्षणात
मनोहारी तो दिसला
शेतकरी तो शिवारी
शेती कार्यास लागला.
