STORYMIRROR

SURYAKANT MAJALKAR

Others

3  

SURYAKANT MAJALKAR

Others

आनंदाला उधाण आलयं

आनंदाला उधाण आलयं

1 min
42

आनंदाला उधाण आलय

आनंदाला उधाण आलय ।।ध्रु.।।


इतका इतका आनंद झालाय

की अधरानाही मुकेपण आलय

आसवं गाळणार्‍या लोचनांना

आनंदाने पाणावलयं

आनंदाला उधाण आलयं (१)


मातीतून कोंब वर आलय

अंगणात सप्तरंगी इंद्रधनु आलय

आनंदाला उधाण आलयं (२)


ढ्यावं ढ्यावं रडणार बाळ

आईला पाहून खुश झालय

आनंदाला उधाण आलय (३)


गुणपत्रिका पाहून बाबाचं

मन प्रसन्न झालय

आनंदाला उधाण आलय. (४)


कोरड्या भेगाळल्या जमिनीवरती

मेघराजा प्रसन्न झालाय

आनंदाला उधाण आलय (५)


सर्वच कसं माझ्या मनासारखं झालय

रोज रोज रुसणार्‍या गालावरती

आज ठाशीव हसू आलय

देवाजीच्या कृृृपेने मन भरुन आलय (६)


Rate this content
Log in